Saturday, July 18, 2020

एक कटू सत्य - लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा



lagnasathi mulinchya apeksha
life partner kasa asava

एक कटू सत्य - लग्नासाठी मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा 


लग्नाचं वय. गैरसमज नसावा. नीट विचार करा

सर्व मुलांनो मुलींनो व त्यांच्या पालकांनो कुठेतरी थांबायला शिका रे!! सर्वसाधारणपणे १८/१९/ 20/ 21व्या वर्षि मुलगी वयात येते या वयात साधारण दिसणाऱ्या मुलीही स्वरूप दिसतात  मुळातच सुंदर असल्या, तर त्या अधिकच छान रेखीव आकर्षक दिसतात.!! विविध लग्नसमारंभात कार्यक्रमात अशा मुली उठुन दिसतात!!


आणि बऱ्याच वेळी अशा मुलींना आपणहुन चांगली स्थळे सांगुन येतात .
विचारणा होते, 

त्यावेळी!!!

पण .पण पण

स्वतःहुन असे कुणी विचारले व जरी ते स्थळ चांगले असले, तरी मुलीच्या वडिलांच्या डोक्यात वारं शिरतं.

ते अचानक भाव खायला लागतात. 

  • त्यांचे उत्तर लगेच तयार असते : 
  • मुलीला अजुन शिकायचे आहे,
  • करीयर करायचे आहे,​​
  • स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे"
असे सांगुन अशी चांगली चालत आलेली स्थळे टाळली जातात


मग काय, मुलगीपण अभ्यासाला लागते.

चांगली डिग्री मिळवते. तोपर्यंत ती २२/२३ वयाची होते. मग लगेच लग्नाचा विचार करायला हरकत नसते,
पण  नुसत्या डिग्रीने काय होते,  अजुन उच्च शिक्षण घेतले म्हणजे अजुन मोठ्ठे तोलामोलाचे स्थळ मिळेल,
असे म्हणुन परत शिक्षण सुरुच रहाते. तोपर्यंत मुली पंचवीशीच्या होतात. 

अभ्यास करुन करुन तब्बेत बिघडते. चेहऱ्यावरील गोडवा कमी कमी होत जातो. पुर्वीच्या पिढीत म्हणजे पंधरा वीस वर्षापुर्वीपर्यंत पंचविशीत पोरींना दोन एक पोर होवुन परत त्या मोकळे फिरायला मोकळ्या रहायच्या


मग,  

मग आता पंचविशीत मुलगी नोकरीच्या शोधात व बाप स्थळाच्या शोधात निघतो.
बरे स्थळ शोधतांना किती किस काढावा? त्याला पण एक मर्यादा असते :
  • सरकारी नोकरीच हवी, किंवा चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर असावा,
  • किंवा खुप खुप पगार असावा,
  • तसेच त्याच्याकडे गाडी-फ्लॅट हवा,
  • दिसायला चांगला हवा,
  • वयात जास्त अंतर नको व अगदी कमीही नको,
  • एकुलता एक शक्यतो नसावा,
  • सासु सासरे मग कायमच बोकांडी बसतील नां
  • आई बाप मुलाजवळ रहाणारे नकोत,
  • धंदेवाईक नको, पण व्यावसायिक हवा, परंतु त्यांना हे देखील काळात नाही कि या दोन्हीचा अर्थ हा एकाच आहे
  • शेतकरी तर नकोच, पण शेती मात्र हवी आहे, कारण शेती करायला नाही आवडत ना. 
  • फक्त पुणे मुंबई बंगलोर सारख्या मेट्रो सिटीतच हवा किंवा US/UK त असावा.
  • काय काय म्हणुन अपेक्षा असाव्यात, याला मर्यादाच नाही
  • बरे सगळा तपास बाहेर बाहेरुनच चालतो. 
  • प्रत्येक स्थळात काही ना काही खोट काढत काढत पोरीचे वय २७/२८/२९वर येवुन पोहोचते
  • पोरगी नोकरी करायला लागली असेल तरी, किंवा नोकरी लागली नाही तरी,
  • जिथे नोकरी करते, त्याच गावातील स्थळ हवे. आपल्यापेक्षा जास्त पगारवालाच हवा, या नादात वये वाढत जातात. 

निसर्गनियमानुसार चेहऱ्याचे तेज कमी कमी होत जाते. तोलामोलाचे स्थळ मिळणे मुश्किल होत जाते. 
तरीसुद्धा अजुनही तडजोड करायची तयारी नसते.


मग केव्हातरी कुणालातरी उपरती होवुन २८/३० त लग्ने उरकली जातात. सगळ्यांचा उत्साह तोपर्यंत निघुन गेलेला असतो. हे तर खूपच बरे २८/३० त लग्ने होवुनही यांना मुलाबाळांची घाई नसते.
अगोदर सगळे व्यवस्थित झाल्यावर किंवा दोनतीन वर्षा नंतर मुल आणायचे असे यांचे महान विचार 


शरीरात अनेक हार्मोन्स बदल झालेले असतात तोपर्यंत प्रकृतीचा/शरीराचा आकार पार बिघडुन गेलेला असतो.


मग
मग काय? सगळे स्थिर स्थावर झाल्यावर मुलाचा विचार. ३४/३५ व्या वर्षी मुल. तोपर्यंत मुलीच्या आईचे/सासुचे वय ६० च्या पुढे. त्यांना स्वतःचेच सुधरत नाही, तर त्या काय पोरींचे बाळंतपण व पुढचे सोपस्कार काय करतील?  पण करतात बिचाऱ्या स्वतःची ओढाताण करुन.

नंतर मग :

मग काय ?
४/६ महीन्याचे बाळ आईच्या/सासुच्या देऊन चालल्या नोकरीवर त्यांचाही नाईलाज व बाकीच्यांचाही.


खरे तर वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या चांगल्या असतात. पण यांना कोण समजवणार??


म्हणुन कीं मुलि आणि मुलांनो,

सर्व मुलींनोआणि मुंलांनो त्यांच्या पालकांनो, आपल्या अपेक्षा कमी करा काहीतरी तडजोड करुन कुठेतरी थांबायला शिका हो!! आणि कुणि फोन करून चौकशि केलि तर एकमेंकाना घोळवत ठेवन्यापेक्षा जे कारन असेल ते स्षष्ट सांगत चला. संसारात सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही मिळत. काहीतरी डावं उजवं होतचं.
काही चुकीचे वाटल्यास क्षमा असावी.

सोन्याचा साठा करुन मिळविलेल्या श्रीमंतीपेक्ष्या जीवनातील बऱ्याच गोष्टी वेळेवरच करण्याचा प्रयत्न करत राहा तीच खरी श्रीमंती सर्वच या विचारांशी सहमत असतील असे नाही पण हा लेख म्हणून प्रत्येक लग्न कार्यालयाच्या बाहेर जरूर लिहावा, सर्वसामान्य व्यक्तींनी जरूर विचारात घ्यावा.


lagnala mulgi pahije
jodidar kasa asava


लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा :

सगळ्याच मुली म्हणतात आम्हाला मुलगा इंजिनिअर पाहिजे, 
त्याचा जॉब सरकारी असावा, नाहीतर नोकरीत चांगल्या पोस्टला कायमस्वरूपी पदावर कार्यरत असावा. 
पगार कमीत कमी 40000/- असावा
शेती पण भरपूर पाहिजे 

आणि वरतून मुलांनाच टोमणे मारायचे की मुलांच्या खूप अपेक्षा असतात पाहिले तुम्ही तुमच्या अपेक्षा कमी ठेवा एखाद्या इमानदार निर्व्यसनी गरीब घरातील मुलांना ते हो म्हणणार नाही, ज्याच्याकडे जास्त प्रॉपर्टी आहे तो दिसायला कसा पण असला तर चालतो तो दारू पिवून गटारात लोळणारा चालतो. 

पण एखाद्या इमानदार मुलाला हो म्हणणार नाही.  मुली आणि मुलीचे वडील आणि घरचे आणि मग नंतर लवकर घटस्फोट होतात मुलाची खरी परिस्थिती नंतर माहीत पडते लग्न झाल्यानंतर मग तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते​​

यांना घर गावात पण वाढलेलं पाहिजे आणि शहरात पण स्वतःच घर पाहिजे शहरात स्वतःच घर पाहिजे तर मग गावाकडे घर बांधलेले कशाला विचारता मग गावाकडच्या घर शेती कमी आणि घर साधं असल तर ते पण नाही चालत आणि गावाकडे चांगलं घर आहे तर शहरात पण ​​घर पाहिजे यांना फक्त प्रॉपर्टी वाला मुलगा पाहिजे मग तो कसा पण असो लफडेखोर असो दारू पिणारा असो दिसायला फॅन्ड्री तल्या जब्या सारखा पण चालतो. 

एक वेळ मुलीच्या आई वडिलांनी देखील विचार करायला हवा कि, मुलगा 26,27 वयामध्ये स्वतःच घर घेणं शहरामध्ये कसं काय शक्य आहे.  
मुलगा स्वतःच्या पायावर उभा आहे कमवता आहे हे महत्वाचे. कारण शून्यातून विश्व निर्माण करण्याचे स्वप्नं आणि ते स्वप्नं पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी मेहनत हि फक्त आणि फक्त स्वावलंबी व्यक्तीच करू शकतो. मुलगा हा त्याचे  आई वडील यांच्या वर अवलंबून नाही हे महत्वाचे असते . 


​पणकुणा मध्यमवर्गीय मुलाला नाही देणार थोड्या अपेक्षा कमी करून त्यांच्या आणि कुणा मुलाने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीशी लग्न करायला तयार आला तर ते यांना चालत नाही आणि मुलगी 23 वर्षाची आहे आणि मुलगा 40 वर्षाचा आहे ते चालते घटस्फोटित डिव्होर्स विधवा विधुर या मुलींच्या अपेक्षा पण वाढून गेल्याल्या आहेत 

हेच लोक अगोदर मुलाची प्रॉपर्टी बघून फसतात पण लग्नाच्या अगोदर चौकशी करणार नाही आणि चांगल्या मुलांना पण बदनाम करतात.  

पण एखाद्या गरीब मध्यमवर्गीय हुशार मेहनती इमानदार निर्व्यस​​नी मुलाला देणार नाही हे आणि मग देतात द्दुसाऱ्या जातीच्या मुलांमध्ये करतात लग्न नाही खूप प प्रॉपर्टी च्या लालचे पायी मुलींचे लग्न थांबवून ठेवतात आणि मुलीचे वय वाढत जाते.

जर लग्न जमू लागले कि, 

म्हणजे मुलीचे आई बाबा यांना एखादा मध्यमवर्गीय मुलगा पसंद आला, सर्व काही ठीक आहे, तर अचानक मुलीकडचे नातेवाईक / मामा/ काका / आत्या हे लोक मुलीच्या आई बाबांचे कां भरतात, कि मुलगा private नोकरी करत आहे, निकरी चे काही खर नसते , 

जरी मुलाचे स्वतःचे घर आहे परंतु कधीही काम सुटू शकते, त्यासाठी मुलाला किमान २ एकर शेती असायला हवी. मग हे ऐकून मुलीचे आई बाबा विचार करायला लागतात. आणि शक्यतो मुलाला लग्नासाठी थेट नकार देखील देतात . 

नातेवाईकांचे ऐकुन मुलाला नकार देणाऱ्या पालकांसाठी मी हेच सांगू इच्छितो : 
उच्चशिक्षित मुलगा जर वयाच्या २५ वर्षी शिक्षण पूर्ण करून नोकरीत रुजू झाल्यावर तो लगेच ३ ते ४ वर्षात लगेच घर कसे घेऊ शकतो. 

मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या अशा वागण्याने तरुण मुलांचे मानसिक खच्चीकरण होत आहे हि बाब त्याच्या लक्षात येत नाही, 

बऱ्याचदा मुलांची अपेक्षा खूप काही नसते, मुले सर्व गोष्टी समजून घेण्यासही तयार असतात, 

माझ्या मित्रानो, जर आपण मुलगी लग्नासाठी मुलगी बघत असाल तर आणि तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील किंवा येत असतील तर दुःखी होण्याचे काही कारण नाही, कारण अशी अपेक्षा करणे हे त्यांचे विचार असतील तर तुम्ही समाजातील अशा लोकांचा विचार करून स्वतःला कमी समजून नका घेऊ. 

माझ्या मते, ह्या गोष्टींचे दुःख करत बसण्यापेक्षा, त्याऐवजी तुम्ही अनाथ आश्रम मधील मुलीसोबत तुम्ही विवाहबद्ध होऊ शकता, कारण हि विचारसरणी देखील उत्तम आहे, त्या एका अनाथ मुलीचे कल्याण होईल. हे तुमचे मोठेपण अनाथ मुलगी कधीच विसरू शकणार नाही, लालची लोकांसोबत सोयरीक जुळवण्यापेक्षा हा पर्याय योग्य आहे असे मला वाटते. 

अनाथ मुलगी शेवट पर्यंत तुम्हाला ईश्वराचा दर्जा देईल.

धन्यवाद !!!


काही चुकले असेल तर क्षमा असावी.........

​​अंडा घोटाला - मराठी रेसिपी


How to Make anda ghotala


​​अंडा घोटाला - मराठी रेसिपी 


साहित्य : (प्रमाण दोन जणांना पुरेल इतकं आहे)

  • ६ अंडी,
  • १ मोठा कांदा बारीक चिरून,
  • १/२ चमचा आलं लसूण पेस्ट,
  • २ मोठे टोमॅटो बारीक चिरून,
  • १-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून,
  • १/४ चमचा हळद,
  • १/२ चमचा तिखट,
  • १/२ चमचा धने पूड,
  • १ चमचा जिरे पूड,
  • १/२ चमचा पावभाजी मसाला,
  • मीठ चवीनुसार,
  • कोथिंबीर भरपूर प्रमाणात
  • आणि २-३ चमचे तेल.


कृती :

१) सहा अंड्यांपैकी १ अंडं उकडून घ्यावे.


२) एका पसरट फ्राय पॅनमध्ये तेल तापवून त्यात कांदा नीट परतून घ्या. त्यात आलं लसूण पेस्ट घालून छान मिक्स करा आणि गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्या.


३) बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घाला आणि नीट मिक्स करा आणि त्यात हळद, तिखट, धने जिरे पूड आणि पावभाजी मसाला घालून नीट मिक्स करून घ्या. १ ग्लास पाणी घालून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवा. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता त्यात उकडलेलं अंडं किसून घाला आणि नीट मिक्स करून घ्या, आता त्यात चवीनुसार मीठ घाला.


४) एका वाटीत ३ अंडी फोडून ती फेटुन घ्या आणि पॅनमध्ये घालून लगेच हलवा आपल्याला scrambled eggs टाईप consistency हवी आहे. मसाला नीट मिक्स होऊ द्या. आपल्याला एकदम कोरडी नाही आणि एकदम पातळ नाही अशी consistency हवी आहे.


५) आता पॅनमध्ये मसाला थोडा साइडला करून दोन गोल करून घ्या यात आपल्याला जी दोन अंडी उरली आहेत ती घालायची आहेत फोडून आपण हाफ फ्राय कसं करतो त्याप्रमाणे.


६) एक एक करून दोन्ही अंडी त्या केलेल्या गोलात टाकावी आणि त्यावर थोडं मीठ आणि तिखट भुरभुरावे.


७) झाकण ठेवून एक पाच मिनिटे वाफ आणावी आणि भरपूर कोथिंबीर घालून मस्त चमचमीत असा अंडा घोटाळा सर्व्ह करावा.


​​egg recipes in marathi | Prepare egg ghotala street food

Friday, July 17, 2020

​​सोलकढी - मराठी रेसिपी


​​सोलकढी - मस्त गुलाबी, थंडगार मराठी रेसिपी 



solkadhi with coconut milk powder goan style


प्रत्येक प्रांतात त्या त्या ठिकाणी पिकणाऱ्या, उगवणाऱ्या गोष्टींपासून किती निरनिराळे पदार्थ बनवले जातात नाही?


खूप कुतूहल वाटतं आणि माणसाच्या कल्पनाशक्तीचा विचार अशा वेळी मनात आल्याशिवाय राहत नाही. आपल्या देशावर तसा रोजच्या जेवणात नारळाचा वापर कमीच, शेंगदाण्याचा भरपूर! पण कोकणात मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती !


 नारळ, तांदूळ, कोकम, आंबे, फणस, काजू या आसपास मिळणाऱ्या गोष्टींचा वापर करून नवनवे पदार्थ बनवले जात असतील अगदी पूर्वीपासून!


सोलकढी त्यापैकीच एक टेस्टी पदार्थ ! उन्हाळ्यात तर विशेष थंडावा देणारा ! कोकम सरबत आपण नेहमीच पितो! आमसुलं ओली असताना त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून ठेवले जातात. 


साखर, जिरेपूड घालून सरबत बनवण्यासाठी रेडिमिक्स केलं जातं, काही आमसुलं वाळवून आमटीत टाकण्यासाठी विकायला पाकिटं बनवली जातात, तसंच आगळं म्हणजे कोकमचं घट्ट सत्व किंवा सार म्हणा ना, तेही बनवलं जातं. चिंचेचा कोळ काढतो तसा हा आमसुलाचा कोळच! 


कोकमाची ताजी फळं चिरुन गर आणि साली आधी वेगळ्या केल्या जातात आणि मग मीठ मिसळून त्यापासून हा घट्ट कोळ काढून घेतला जातो. हे आगळ घरात असेल तर सोलकढी पट्कन करता येते.


दोन नारळ तातडीने फोडून, ओलं खोबरं काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. त्यात एक दीड तांब्या चांगलं कडकडीत पाणी घालून सगळं हातानं कुस्करून नारळाचं दाट दूध, पांढरंशुभ्र काढून गाळून घेतलं! त्या नारळाच्या चवाचा पार चोथा होईपर्यंत त्यात पाणी घालून सगळं सत्व काढून घेतलं.


आपल्याला कढी जशी घट्ट, पातळ आवडते तशी नारळाच्या दुधाची कनसिस्टंसी ठेवायची. त्यात बेताचं आंबट होईल इतकं आगळ घालायचं, अहाहा, बेबी पिंक कलर लगेच यायला लागतो. मग चवीप्रमाणे मीठ, साखर, जिरेपूड आणि कोथिंबीर घालायची ! 


बरेच जण यात मिरची आणि लसूण ठेचून घालतात पण आम्हाला लसणाची कच्ची चव यात आवडत नाही म्हणून मी फक्त दोन तीन हिरव्या मिरच्या जराश्या ठेचून टाकते आणि हवा तेवढा तिखटपणा उतरला की काढून टाकते.


पुष्कळ जण यात वरुन तूप जिऱ्याची फोडणी देतात, काहीजण तर चक्क ही कढी उकळतात देखील पण त्यामुळे चव तर बदलतेच पण बरेचदा नारळाचं दूध फाटतं ! त्यामुळे ही बिन फोडणीची गार सोलकढीच प्यावी मस्त !


सगळं एकजीव करुन तासभर सगळी चव छान मुरेपर्यंत फ्रिजमध्ये गार करत ठेवावी. मग सुंदरशा ट्रांस्परंट ग्लासमध्ये ओतून दुपारी उन्हाच्या वेळी एक एक घोट सावकाश चव घेत घेत ही सोलकढी प्यावी ! 


आत्मा अगदी थंड होतो ! उन्हाच्या झळा, गरमी, घाम या सगळ्याचा काही वेळ तरी नक्कीच विसर पडतो ही खात्री !


health benefits of sol kadhi | prepare instant konkani recipe in marathi

Thursday, July 16, 2020

​​सिमला मिरची बटाटा भाजी - मराठी रेसिपी


​​सिमला मिरची बटाटा भाजी - मराठी रेसिपी 



simla mirchi bhaji recipe marathi


ही एक वेगळ्या प्रकारची सिमला मिरचीची सुकी भाजी आहे. याचा वेगळेपणा भाजी चिरण्यापासूनच दिसून येतो.यात सिमला मिरची आणि बटाटे लांब पातळ तुकडे करून घालतात  

जसे आपण फ्रेंच फ्राईज बनवताना करतो.आणि यात फक्त गरम मसाला, चाट मसाला आणि लाल तिखट घातलं जातं. आणि ही भाजी फार शिजवत नाहीत.

सिमला मिरची, बटाट्याचे तुकडे व्यवस्थित दिसले पाहिजेत. कांदा लसूण न घालताही ही भाजी खूप टेस्टी बनते. नेहमीच्या सिमला मिरचीच्या भाजी ऐवजी ही वेगळी भाजी नक्की करून बघा.


साहित्य (३ जणांसाठी):

  1. सिमला मिरची २ मध्यम
  2. बटाटे ३ मध्यम
  3. लाल तिखट अर्धा चमचा
  4. गरम मसाला अर्धा चमचा
  5. चाट मसाला अर्धा चमचा
  6. चिरलेली कोथिंबीर १ चमचा
  7. साखर अर्धा चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. फोडणीसाठी
  10. तेल १ चमचा
  11. जिरं पाव चमचा
  12. हळद पाव चमचा
  13. हिंग चिमूटभर


कृती:

१. सिमला मिरची धुवून दोन भाग करून बिया आणि पांढरा भाग काढून टाका. मिरचीचे लांब पातळ तुकडे करा– फ्रेंच फ्राईज सारखे.


२. बटाटे सोलून लांब पातळ तुकडे करा – फ्रेंच फ्राईज सारखे.


३. एका कढईत तेल गरम करून जिरं आणि हिंग घालून फोडणी करा.


४. त्यात बटाट्याचे तुकडे घाला, हळद घाला. मिक्स करून झाकण ठेवून २–३ मिनिटं शिजवा. पाणी घालू नका. मध्ये एकदा भाजी ढवळून घ्या.


५. आता कढईत सिमला मिरचीचे तुकडे घाला. मिक्स करून झाकण ठेवून २ मिनिटं शिजवा. सिमला मिरची आणि बटाटे जरा नरम झाले की पुरे. ही भाजी जास्त शिजवत नाहीत.


६. कढईत गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, मीठ,साखर घालून मिक्स करा. १ मिनिट झाकण न ठेवता शिजवा.


७. चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. सिमला मिरची बटाट्याची चविष्ट भाजी तयार आहे.


८. गरमागरम भाजी पोळी / भाकरी बरोबर खायला द्या.
​​

how to prepare aloo shimla mirch | shimla mirch recipe in marathi written

Wednesday, July 15, 2020

थालीपीठ भाजणीची उकळपेंडी - मराठी रेसिपी


थालीपीठ भाजणीची उकळपेंडी - मराठी रेसिपी :



thalipeeth recipe marathi



लागणारा वेळ: २० मिनिटे


लागणारे जिन्नस:


१. एक वाटी थालीपीठ भाजणी​​
२. दीड वाटी ताक
३. दोन मोठे चमचे तेल
४. अर्धा चमचा प्रत्येकी मोहरी व जीरे
५. पाव चमचा हिंग
६. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
७. आठ-दहा कढीपत्त्याची पाने
८. एक चमचा लाल तिखट
९. पाव चमचा हळद
१०. चवीप्रमाणे मीठ
११. मूठभर कोथिंबीर
१२. चिमूटभर साखर (ऐच्छिक)


कृती:


१. सुरुवातीला मंद आचेवर कढईत ५-७ मिनिटे एक वाटी थालीपीठ भाजणी कोरडीच खमंग भाजून बाजूला काढून घ्या.


२. आता कढईत दोन मोठे चमचे तेल घालून गरम झाल्यावर नेहमीप्रमाणे मोहरी, जीरे, हिंग व कढीपत्त्याची फोडणी करा.


३. फोडणीत बारीक चिरलेला कांदा घालून त्याला गुलाबी होईस्तर परता.


४. कांदा मऊ झाल्यावर १ चमचा तिखट, पाव चमचा हळद व चवीप्रमाणे मीठ घालून एक वेळा नीट ढवळून घ्या (चिमूटभर साखर ऐच्छिक).


५. आता थालीपीठ भाजणी घालून, २-३ मिनिटे परतून घ्या आणि दीड वाटी ताक घालून चांगली दणदणीत वाफ काढा.


६. खायला देताना वरून कोथिंबीर भुरभुरा.


वाढणी/प्रमाण:

२ व्यक्तींसाठी (एक वाटी थालीपीठ भाजणीची दोन ते अडीच वाट्या उकळपेंडी होते)


अधिक टिपा:

१. थालीपीठ भाजणीत गहू, ज्वारी, बाजरी, चणा व उडीद डाळ असल्याने, पूर्णान्न होत. आणखी पौष्टिक करायला मेथीची मुठभर पानेही घालू शकता.


२. घरी एकटे आहात, चपाती/थालीपीठ बनवायचा कंटाळा आला असल्यास पोटभरीचा उत्तम पर्याय आहे. ब्रंचसाठीही उत्तम पर्याय आहे.


३. थालीपीठ भाजणी कोरडीच व खमंग भाजण्यावरच उकळपेंडीचा स्वाद अवलंबून आहे (त्यासाठी आच मंदच ठेवावी, जळता कामा नये).


४. आधी थालीपीठ भाजणी कोरडीच भाजायची असल्याने फोडणीत जरा जास्तच तेल लागते (शिवाय विदर्भातील हवामान कोरडे असल्याने तेल जास्तच वापरले जाते)


५. मी उकळपेंडी शिजवायला ताक वापरले आहे, त्यामुळे किंचित आंबटपणा येतो. मात्र पूर्व विदर्भात गव्ह्याच्या/ज्वारीच्या पीठाची उकळपेंडी केली जाते आणि ती शिजवायला गरम पाणी वापरतात.


६. उकलपेंडी मऊसर व्हायला, एक वाटी थालीपीठ भाजणीला दीड वाटी ताक पुरेसे आहे. मोकळी आवडत असल्यास १ वाटी ताक घालावे.


७. लाल तिखटाने खमंगपणा येतो, तसा हिरव्या मिरचीने येत नाही.



bhajani thalipeeth nutrition | thalipeeth recipe in marathi

Tuesday, July 14, 2020

ज्वारीच्या पिठाचा ढोकला - recipe in marathi


ज्वारीच्या पिठाचा ढोकला अगदी काही क्षणातच :


आपण बहुतेकदा ढोकळ्यासाठी बेसन किंवा रवा यांचा जास्त वापर करतो. एक ग्रामीण भाग सोडला तर ज्वारीचा वापर आपल्याकडे तसा कमीच होतो. तेव्हा ज्वारीच्या पिठापासून बनवलेला ढोकळा जरुर करुन पाहावा.


साहित्य


  • एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ,
  • अर्धा वाटी दही,
  • आलं-मिरचीची पेस्ट,
  • मीठ,
  • हवी असल्यास चिमूटभर साखर,
  • मोहोरी,
  • तीळ,
  • कोथिंबीर,
  • एक चमचा फ्रूट सॉल्ट

कृती-

  • प्रथम एका पसरट भांड्यात ज्वारीचं पीठ, दही, आलं- मिरची पेस्ट आणि मीठ आवश्यकतेनुसार पाणी घालून एकत्र कालवा.
  • पीठ खूप घट्ट वा खूप पातळ कालवू नये.
  • साधारण दहा-पंधरा मिनिटं ते भिजू द्या.
  • एका बाजूला स्टिमर किंवा कुकरमध्ये तळाला पाणी घालून गॅसवर ठेवा.
  • आता या भिजलेल्या पिठात फ्रूट सॉल्ट घालून ते हलकंच हलवून ढोकळ्याच्या ताटलीला तेल लावून त्यावर ओता.
  • यानंतर स्टिमरमध्ये साधारण बारा ते पंधरा मिनिटं वाफवा.
  • हा ढोकळा जरा थंड झाल्यावर त्यावर मोहोरी आणि तीळाची फोडणी घाला, नंतर त्यावर कोथिंबीर भुरभुरा आणि सर्व्ह करा.
  • आवडत असल्यास ओलं खोबरं घालायला हरकत नाही.

टीपा:

  • याप्रमाणे नाचणीच्या पिठाचाही ढोकळा करता येतो.
  • ढोकळा किंचित रवाळ हवा असल्यास या पिठात एक ते दोन चमचे रवा घाला.


jwarichya pithacha dhokla recipe in marathi 

Daily routine in marathi sentences lesson -1

101 Use lines on daily routine in marathi


101 Use lines on daily routine in marathi - lesson -1 



Queries :

  • Can sentences example in Marathi?
  • How can I speak fluent in Marathi?
  • What is your name in Marathi translation?
  • How are you in Marathi respect?


मराठीत इंग्रजी भाषांतर कसे शिकावे : 


1. You tried.    तुम्ही प्रयत्न केलात.

2. Are you OK?  ठीक आहेस का? बरा आहेस का?

3. Ask anyone.  कोणालाही विचार.

4. Be careful!   सावध रहा!

5. I'm so fat.   मी किती जाडा आहे. मी किती जाडी आहे.

6. I'm trying.   मी प्रयत्न करतोय. मी प्रयत्न करतेय.

7. Is he tall?    तो उंच आहे का? ते उंच आहेत का?

8. Is it done?   झालंय का?

9. Is it free?   फुकटात आहे का? मुक्त आहे का?

10. I was good.  मी चांगला होतो. मी चांगली होते.

11. I was late.   मला उशीर झाला होता.

12. I was sick.   मी आजारी होतो. मी आजारी होते.

13. I work out.   मी व्यायाम करतो. मी व्यायाम करते.

14. I'll leave.   मी निघेन.

15. He is late.   त्याला उशीर झाला आहे

16. He is nice.   तो चांगला आहे

17. He laughed.   तो हसला. ते हसले.

18. He's Swiss.   तो स्विस आहे

19. He's smart.   तो हुशार आहे. ते हुशार आहेत

20. Hold still.   हलू नकोस. हलू नका.

21. Is it hard?   कठीण आहे का?

22. Is it here?   इथे आहे का?

23. Is it nice?   चांगलं आहे का?

24. Is it time?   वेळ झाला आहे का?

25. Is it true?   खरं आहे का?

26. Is that so?  असं का?

27. I remember.  मला आठवतं. मला आठवतो. मला आठवते.

28. I screamed.  मी किंचाळलो. मी किंचाळले.

29. I see that.  ते मला दिसतंय.

30. I see them.   मला ते दिसतात. मला त्या दिसतात. मी त्यांना बघतो.

31. I eat rice.  मी भात खातो. मी भात खाते.

32. I like him. मला तो आवडतो. मला ते आवडतात.

33. I like tea.   मला चहा आवडतो.

34. I like you.   मला तू आवडतोस. मला तू आवडतेस. मला तुम्ही आवडता.

35. I love you.  माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे.

36. It's ready.  तयार आहे.

37. It's white.  सफेद आहे. पांढरा आहे.

38. It's yours.  तुझंय. तुझं आहे. तुमचं आहे.

39. Jesus wept.  येशू रडला.

40. Keep quiet!  शांत हो! शांत व्हा! शांत राहा!

41. Let him go!  सोडा त्याला! सोडा त्यांना!

42. Shadow him.  त्याचा पाठलाग करा. त्याचा पाठलाग कर.

43. She is old.  ती म्हातारी आहे. ती वयस्कर आहे.

44. Smell this.   याचा वास घे. याचा वास घ्या.

45. Stand back!   पाठी हो! पाठी व्हा!

46. Start here.  इथून सुरुवात कर. इथून सुरू कर.

47. I'm hungry.  मला भूक लागली आहे.

48. I'm scared.  मी घाबरलोय.

49. I'm scared.  मी घाबरले आहे.

50. I'm sleepy!  मला झोप आली आहे!

51. It's alive.   जिवंत आहे.

52. It's night.  रात्र आहे.

53. Let me see.  मला बघू दे. मला बघू द्या.

54. Let's chat.  गप्पा मारूया.

55. Let's kiss.  किस करूया.

56. Let's talk.  बोलूया.

57. I eat meat.  मी मांस खातो. मी मांस खाते.

58. I made tea.  मी चहा बनवला.

59. I miss you.  मला तुझी आठवण येते. मला तुमची आठवण येते.

60. I ran away.  मी पळून गेलो.

61. I ran away.  मी पळून गेले.

62. I'm 30 now.  मी आता ३० वर्षांचा आहे. मी आता ३० वर्षांची आहे.

63. I'm a liar. मी खोटारडा आहे. मी खोटारडी आहे.

64. I'm a poet.  मी कवी आहे.

65. I'm coming.  मी येतोय. मी येतेय.

66. I'm hungry!  मला भूक लागली आहे!

67. Look at me.  माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघा.

68. Look there.  तिथे बघ. तिथे बघा.

69. Love lasts.  प्रेम टिकतं.

70. Never mind!  सोडा! सोड! जाऊ दे! जाऊ द्या!

71. No one ran.  कोणीही धावलं नाही.

72. Quiet down.  शांत हो. शांत व्हा.

73. Don't move.  हलू नकोस. हलू नका.

74. Don't talk!  बोलू नकोस! बोलू नका!

75. Fill it up.  भरून टाक.

76. Fire burns.  आग जळते. आग जाळते.

77. God exists.   देव असतो.

78. He is here!  तो इथे आहे! इथे आहे!

79. He is here!  इथे आहे तो!

80. I am a man.  मी माणुस आहे. मी पुरुष आहे.

81. I am ready.  मी तयार आहे.

82. Don't look.  बघू नकोस. बघू नका.

83. Forget him.  त्याला विसर. त्याला विसरून जा.

84. I can read.  मला वाचता येतं. मी वाचू शकतो.

85. I can swim.  मला पोहता येतं. मी पोहू शकतो. मी पोहू शकते.

86. I can walk.  मी चालू शकतो. मी चालू शकते.

87. Be on time.  वेळेवर पोहोच. वेळेवर पोहोचा.

88. Birds sing.  पक्षी गातात.

89. Bring wine.  वाईन आण. वाईन आणा.

90. Come again.  पुन्हा या. पुन्हा ये.

91. Come on in.  आत ये.

92. Come quick!  लवकर ये! लवकर या!

93. Definitely!  नक्कीच!

94. Do men cry?  माणसं रडतात का? पुरुष रडतात का?

95. I eat here.  मी इथे खातो. मी इथे जेवतो.

96. I want you.  मला तुम्ही हवे आहात. मला तू हवा आहेस.

97. I'll start.  मी सुरुवात करेन. मी सुरुवात करतो. मी सुरुवात करते.

98. It's my CD.  माझी सीडी आहे. ती माझी सीडी आहे.

99. Look again.  परत बघ. परत बघा.

100. Look ahead.  पुढे बघ. समोर बघ. समोर बघा.


मराठी वापरले जाणारे इंग्रजी शब्द 

Monday, July 13, 2020

नानखटाई - मैद्याची - मराठी रेसिपी

​​

नानखटाई - मैद्याची  मराठी रेसिपी 



साहित्य:

  1. 12 टेस्पून तूप
  2. १/२ कप साखर (सुपरफाईन)
  3. सव्वा कप मैदा
  4. २ टिस्पून बेसन पिठ
  5. १/४ टिस्पून बेकिंग पावडर
  6. 2 टिस्पून रवा
  7. vanilla essense 2 drops


कृती:

  1. मैदा, बेसन पिठ, बेकिंग पावडर आणि रवा हे सर्व एकत्र करून चाळून घ्यावे ज्यामुळे सर्व जिन्नस एकसारखे मिक्स होतील.
  2. मऊसर तूप आणि साखर एकत्र करून हॅण्डमिक्सरने फेसून घ्यावे. हे मिश्रण अगदी हलके झाले पाहिजे. साधारण ८ ते १० मिनीटे फेसावे.
  3. फेसलेल्या मिश्रणात हळूहळू चाळलेले पिठ घालून हॅण्डमिक्सरने एकत्र करून घ्यावे. मिश्रण नरमसर आणि हलके झाले त्यात vanilla essense 2 drops घालूण गोळे करूण तूप लावलेल्या प्लेटमध्ये ठेऊण प्री हिट केलेल्या कढई मध्ये ठेऊण 15/20 मिनिट बेक करावे.


नानखटाई  ओव्हन न वापरता :



साहित्य-

  1. हरभरा पीठ-थोडे जाडसर - 1 वाटी
  2. पिठी साखर- पाऊण वाटी
  3. साजूक तूप-अर्धी वाटी
  4. बेकिंग पावडर -अर्धा लहान चमचा
  5. विलायची-६
  6. पिस्ते - ६
  7. बदाम-६


कृती:

  1. विलायची पूड तयार करा.
  2. पिस्तांचे लहान तुकडे करा.
  3. बदामाचे मधून दोन भाग करा.
  4. छोटी मध्यम उष्णनेतेवर फ्राय पॅन ठेऊन त्यात तूप वितळवून घ्या.
  5. एका ताटात विलायची पूड, पिस्तांचे तुकडे, बेकिंग पावडर, हरभरा पीठ व पिठी साखर चांगली एकजीव करा. वितळलेल्या तुपातील 2 मोठे चमचे तूप वाटीत काढा.
  6. वितळतेले तूप हरभरा पिठात टाकून चांगले मळून घ्या.
  7. कणिक सारखा सैलसर गोळा तयार झाला पाहिजे.
  8. आवश्यक असल्यास अजून तूप टाका.
  9. एक जाड व समतल बुडाचे पातेले कमी उष्णनेतेवर ठेवा.
  10. त्यात अर्धा किलो मीठ किंवा 2 वाटी वाळू टाका. व त्यावर एक जाळी ठेवा.
  11. Pressure कुकर मधील जाळी/इडली करायची सुद्धा चालेल.
  12. त्यावर ताट ठेऊन झाकून ठेवा. पातेले 10-12 मिनिट गरम होऊ द्या.
  13. तो पर्यंत एका खोलगट ताटली मध्ये सर्वदूर तूप लावून त्यात गोळे ठेवा.
  14. गोळे फुलतात त्या अंदाजाने कमीत कमी गोळे ठेवा.
  15. गोळ्यांवर बदाम किंचित दाबून लावा.
  16. आता ताटली प्री हिट केलेल्या पातेल्यात ठेवा.
  17. 15 मिनिटांनी गोळे फुलून त्याचा वरून फिकट लालसर रंग व खाली ब्राउन रंग आला असेल तर गॅस बंद करून गोळे असलेली ताटली पातेल्यातून बाहेर काढा व थंड होऊ द्या.
  18. जर खालून ब्राऊन रंग आला नसेल तर अजून 4-5 मिनिट बेक करा.


nankhatai recipe in marathi | maida biscuit recipe

Sunday, July 12, 2020

आप्पे पात्राचा वापर करून कप केक - मराठी रेसिपी

​​​​आप्पे पात्राचा वापर करून झटपट कप केक बनवा 


त्याची माहिती पुढीलप्रमाणे :


लहान मुलांना आवडेल असा हा शाकाहारी केक आहे.


साहित्य :


1. 1 कप मैदा
2. 1/2 कप पिठी साखर
3. 1 चमचा बेकिंग पावडर
4. चिमूटभर मीठ
5. 1 चमचा व्हॅनिला एसेंस
6. 20 ग्रॅम मिल्क पावडर
7. 2 चमचे साजूक तूप
8. 1/2 कप दूध
9. 2 चमचे टूटीफृटी


कृती :


1. 1 कप मैदा चाळून घ्या. त्यासोबतच टूटीफृटी पण घाला याने टूटीफृटीला पण मैदा लागतो.

2. 1/2 कप पिठी साखर आणि 1 सपाट चमचा बेकिंग पावडर ही चाळून घ्या.

3. सर्व साहित्य एकत्र करून परत चाळून घ्या याने गाठी होत नाहीत व केक हलका होतो.

4. एका मोठ्या बाउल मध्ये सर्व साहित्य घेऊन यामधे मिल्क मेड चं 20 ग्रॅम छोटं पाकीट मिळतं ते घालावे.

5. 2 टिस्पून साजूक तूप घालावे.

6. 1/2 कप दूध थोडं थोडं घालून हे मिश्रण भिजवावं.

7. 2 ते 3 मिनीट पीठ चांगलं फेटून घ्या. डोसा प्रमाणे त्याची कंसस्टंसी ठेवावी.

8. आप्पे पात्र मंद आचेवर प्रीहीट करून घ्या. मैद्यात घोळवलेले टूटीफृटी यात घाला त्यामुळे ते एकसारखे पसरतात आणि केक च्या तळाशी बसत नाहीत.

9. आवडीप्रमाणे व्हॅनिला एसेंस घाला.

10. आप्पे पात्रात थोडे थोडे तूप घाला व चमचाने केक चे बॅटर सोडावे. आधी कडेचे साचे भरावे मग मधले साचे भरावे त्याने मधले केक लवकर लाल होत नाहीत.

11. केक फुगतो त्यामुळे साचा अगदी काठोकाठ न भरता अर्धाच भरावा.
गॅस अगदी मंद आचेवर असावा त्यासाठी गॅस ची जी सर्वात छोटी शेगडी आहे ती वापरा.

12. आप्पे पात्रावर झाकण घालायचं नाहीये. 2-3 मिनीटा नंतर केक चेक करावा. जर जास्त लाल वाटला तर अधून मधून गॅस बंद करावा. साधारण 3-4 मिनीटा नंतर केक पलटवावा. चमचाने आधी केक च्या कडा मोकळय़ा कराव्या आणि मग तो पलटवावा.

13. आता 2-3 मिनीट मंद आचेवर केक ची दुसरी बाजू भाजू द्यावी आणि गॅस बंद करावा. केक छान फुगतो.

14. याला वरुन चॉकलेट चा लेयर देण्यासाठी मायक्रोवेव मध्ये चाॅकलेट बार मेल्ट करून चमचाने तो केक च्या एका बाजूवर पसरून लावावा आणि त्यावर रंगीत बॉल सोडावे याने केक अजून आकर्षक दिसतो.
तयार आहे अंडे न घालता केलेला झटपट कप केक.