Showing posts with label Past Tense. Show all posts
Showing posts with label Past Tense. Show all posts

Friday, June 19, 2020

Past Perfect - Continuous Tense - चालू पूर्ण भूतकाळ

* वापर :


चालू-पूर्ण भूतकाळात (Had) हे योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली होती हे दाखवण्यासाठी त्यापुढे (been) वापरावे व तीच क्रिया पुढे भूतकाळात पुढे सातत्याने चालू होती, हे दाखवण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) वापरतात. अशा प्रकारे चालू-पूर्ण भूतकाळ तयार होतो.

भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली होती व तीच क्रिया भूतकाळात पुढे सातत्याने चालू होती असे दाखवण्यासाठी हा काळ वापरतात.

Past Perfect - Continuous Tense in Marathi with Example


Past Perfect - Continuous Tense with Example :


1. काल दिवसभर आम्ही काम करत आलेलो होतो.
    Yesterday we had been working all day.

2. तो फेब्रुवारी पासून ऑगस्टपर्यंत क्लासला जात आलेला होता .
    He had been going to class from February to August .

3. सकाळपासून पाऊस पडत आलेला होता .
    It had been raining since morning.

4. ते 1 वर्षापासून घर बांधत आलेले होते.
    They had been building a house for 1 year.

5. त्यावेळी मी पुण्यात राहत आलेलो होतो .
    That time I had been living in Pune.

Thursday, June 18, 2020

Past Perfect Tense - पूर्ण भूतकाळ

Past Perfect Tense in Marathi (पूर्ण भूतकाळ)


* वापर :


पूर्ण भूतकाळात (Had) हे योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला तिसरे रूप (V3) वापरतात अशा प्रकारे पूर्ण भूतकाळ तयार होतो.

एखादी क्रिया भूतकाळात एखाद्या ठराविक वेळेच्या आधी किंवा त्यावेळे पर्यंत पूर्ण झाली होती असे दाखवण्यासाठी हा काळ वापरतात. 

Past Perfect Tense with example in marathi

Past Perfect Tense with Example :


1. मी त्याला सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास फोन केला होता. 
    I had called him at 10 O' clock in the morning.

2. तिने तिचे काम पूर्ण केलेले होते. - She had completed her work.

3. मी नाश्ता केला होता. - I had eaten breakfast.

4. परवा ते गावाला गेलेले होते. - They had gone to village day before yesterday.


Yes – No type Questions : 


1. तू त्यांची परवानगी घेतलेली होती का ? - Had you taken their permission ?

2. तू त्यांची परवानगी घेतली नव्हती का? - Hadn't you taken their permission?

3. तिने ती परीक्षा दिलेली होती का ? - Had she given that exam?

4. तिने ती परीक्षा दिली नव्हती का? - Hadn't she given that exam?


WH type Questions : 


1. तुम्ही आम्हाला केव्हा आमंत्रित केलेले होते? - When had you invited us?

2. तुम्ही आम्हाला आमंत्रित का केले नाही? - Why hadn't you invited us?

3. राजूने कोणते पुस्तक वाचले होते? - Which book had Raju read ?

4. राजूने कोणते पुस्तक वाचले नाही ? - Which book hadn't Raju read?