Showing posts with label Present Tense. Show all posts
Showing posts with label Present Tense. Show all posts

Friday, June 19, 2020

Present Perfect - Continuous Tense - चालू पूर्ण वर्तमानकाळ

Present Perfect - Continuous Tense in Marathi (चालू पूर्ण वर्तमानकाळ)


* वापर :


चालू-पूर्ण वर्तमानकाळात (Have/has) हे योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमानकाळात पूर्ण झाली आहे हे दाखवण्यासाठी त्यापुढे (been) वापरावे व तीच क्रिया पुढे वर्तमानकाळत चालू असेन, हे दाखवण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) वापरतात. अशा प्रकारे चालू-पूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.

वर्तमानकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली आहे व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू आहे असे दाखवण्यासाठी हा काळ वापरतात.

Present Perfect - Continuous Tense in Marathi With Example

Present Perfect - Continuous Tense Example :


1. आम्ही सकाळपासून त्यांची वाट पहात आहोत / पाहतोय.
    We have been waiting for them since morning.

2. मी 9 वाजल्यापासून फूटबॉल खेळत आहे/ खेळतोय.
    I have been playing football since 9 O’clock.

3. ते तेथे 4 वर्षांपासून राहत आहेत / राहतोय.
    They have been living there for 4 years.

4. तो दिवसभर चालत आहे/ चालतोय.
    He has been walking whole day.

5. राम 2010 पासून काम करत आहे / करतोय . - Ram has been working here since 2010.

Thursday, June 18, 2020

Present Perfect Tense - पूर्ण वर्तमानकाळ

Present Perfect Tense in Marathi (पूर्ण वर्तमानकाळ)


* वापर :


पूर्ण वर्तमानकाळात ( have, has,) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला तिसरे रूप (V3) वापरावे अशा प्रकारे पूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.

जेव्हा एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळचा उपयोग केला जातो.

Present Perfect Tense with example

Present Perfect Tense with Example : 


1. मी माझी पदवी पूर्ण केलेली आहे. - I have completed my degree.

2. त्याने ते काम केलेले आहे . - He has done that work.

3. आम्ही फुटबॉल खेळलेलो आहोत. - We have play football.

4. सूर्य नुकताच उगवला आहे. - The sun has just risen.


Yes – No type Questions :


1. तू तिथे गेला आहेस का? - Have you gone there?

2. तू तिथे गेला नाहीस का ? - Haven't you gone there?

3. तो तुला भेटला आहे का ? - Has he met you ?

4. तो तुला भेटला नाही का ? - Hasn't he met you ?


WH type Questions : 


1. तुम्हाला हा पुरस्कार कधी मिळाला आहे? - When have you got this award ?

2. तुम्हाला हा पुरस्कार का मिळाला नाही ? - Why haven't you got this award?

3. ती कधी आली आहे? - When has she come ?

4. ती का आली नाही? - Why hasn't she come ?