Present Perfect - Continuous Tense in Marathi (चालू पूर्ण वर्तमानकाळ)
* वापर :
चालू-पूर्ण वर्तमानकाळात (Have/has) हे योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमानकाळात पूर्ण झाली आहे हे दाखवण्यासाठी त्यापुढे (been) वापरावे व तीच क्रिया पुढे वर्तमानकाळत चालू असेन, हे दाखवण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) वापरतात. अशा प्रकारे चालू-पूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.
वर्तमानकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली आहे व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू आहे असे दाखवण्यासाठी हा काळ वापरतात.
Present Perfect - Continuous Tense Example :
1. आम्ही सकाळपासून त्यांची वाट पहात आहोत / पाहतोय.
We have been waiting for them since morning.
2. मी 9 वाजल्यापासून फूटबॉल खेळत आहे/ खेळतोय.
I have been playing football since 9 O’clock.
3. ते तेथे 4 वर्षांपासून राहत आहेत / राहतोय.
They have been living there for 4 years.
4. तो दिवसभर चालत आहे/ चालतोय.
He has been walking whole day.
5. राम 2010 पासून काम करत आहे / करतोय . - Ram has been working here since 2010.
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon