अंडा घोटाला - मराठी रेसिपी
साहित्य : (प्रमाण दोन जणांना पुरेल इतकं आहे)
- ६ अंडी,
- १ मोठा कांदा बारीक चिरून,
- १/२ चमचा आलं लसूण पेस्ट,
- २ मोठे टोमॅटो बारीक चिरून,
- १-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून,
- १/४ चमचा हळद,
- १/२ चमचा तिखट,
- १/२ चमचा धने पूड,
- १ चमचा जिरे पूड,
- १/२ चमचा पावभाजी मसाला,
- मीठ चवीनुसार,
- कोथिंबीर भरपूर प्रमाणात
- आणि २-३ चमचे तेल.
कृती :
१) सहा अंड्यांपैकी १ अंडं उकडून घ्यावे.२) एका पसरट फ्राय पॅनमध्ये तेल तापवून त्यात कांदा नीट परतून घ्या. त्यात आलं लसूण पेस्ट घालून छान मिक्स करा आणि गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्या.
३) बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घाला आणि नीट मिक्स करा आणि त्यात हळद, तिखट, धने जिरे पूड आणि पावभाजी मसाला घालून नीट मिक्स करून घ्या. १ ग्लास पाणी घालून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवा. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता त्यात उकडलेलं अंडं किसून घाला आणि नीट मिक्स करून घ्या, आता त्यात चवीनुसार मीठ घाला.
४) एका वाटीत ३ अंडी फोडून ती फेटुन घ्या आणि पॅनमध्ये घालून लगेच हलवा आपल्याला scrambled eggs टाईप consistency हवी आहे. मसाला नीट मिक्स होऊ द्या. आपल्याला एकदम कोरडी नाही आणि एकदम पातळ नाही अशी consistency हवी आहे.
५) आता पॅनमध्ये मसाला थोडा साइडला करून दोन गोल करून घ्या यात आपल्याला जी दोन अंडी उरली आहेत ती घालायची आहेत फोडून आपण हाफ फ्राय कसं करतो त्याप्रमाणे.
६) एक एक करून दोन्ही अंडी त्या केलेल्या गोलात टाकावी आणि त्यावर थोडं मीठ आणि तिखट भुरभुरावे.
७) झाकण ठेवून एक पाच मिनिटे वाफ आणावी आणि भरपूर कोथिंबीर घालून मस्त चमचमीत असा अंडा घोटाळा सर्व्ह करावा.