nankhatai recipe in marathi | maida biscuit recipe
नानखटाई - मैद्याची मराठी रेसिपी
साहित्य:
- 12 टेस्पून तूप
- १/२ कप साखर (सुपरफाईन)
- सव्वा कप मैदा
- २ टिस्पून बेसन पिठ
- १/४ टिस्पून बेकिंग पावडर
- 2 टिस्पून रवा
- vanilla essense 2 drops
कृती:
- मैदा, बेसन पिठ, बेकिंग पावडर आणि रवा हे सर्व एकत्र करून चाळून घ्यावे ज्यामुळे सर्व जिन्नस एकसारखे मिक्स होतील.
- मऊसर तूप आणि साखर एकत्र करून हॅण्डमिक्सरने फेसून घ्यावे. हे मिश्रण अगदी हलके झाले पाहिजे. साधारण ८ ते १० मिनीटे फेसावे.
- फेसलेल्या मिश्रणात हळूहळू चाळलेले पिठ घालून हॅण्डमिक्सरने एकत्र करून घ्यावे. मिश्रण नरमसर आणि हलके झाले त्यात vanilla essense 2 drops घालूण गोळे करूण तूप लावलेल्या प्लेटमध्ये ठेऊण प्री हिट केलेल्या कढई मध्ये ठेऊण 15/20 मिनिट बेक करावे.
नानखटाई ओव्हन न वापरता :
साहित्य-
- हरभरा पीठ-थोडे जाडसर - 1 वाटी
- पिठी साखर- पाऊण वाटी
- साजूक तूप-अर्धी वाटी
- बेकिंग पावडर -अर्धा लहान चमचा
- विलायची-६
- पिस्ते - ६
- बदाम-६
कृती:
- विलायची पूड तयार करा.
- पिस्तांचे लहान तुकडे करा.
- बदामाचे मधून दोन भाग करा.
- छोटी मध्यम उष्णनेतेवर फ्राय पॅन ठेऊन त्यात तूप वितळवून घ्या.
- एका ताटात विलायची पूड, पिस्तांचे तुकडे, बेकिंग पावडर, हरभरा पीठ व पिठी साखर चांगली एकजीव करा. वितळलेल्या तुपातील 2 मोठे चमचे तूप वाटीत काढा.
- वितळतेले तूप हरभरा पिठात टाकून चांगले मळून घ्या.
- कणिक सारखा सैलसर गोळा तयार झाला पाहिजे.
- आवश्यक असल्यास अजून तूप टाका.
- एक जाड व समतल बुडाचे पातेले कमी उष्णनेतेवर ठेवा.
- त्यात अर्धा किलो मीठ किंवा 2 वाटी वाळू टाका. व त्यावर एक जाळी ठेवा.
- Pressure कुकर मधील जाळी/इडली करायची सुद्धा चालेल.
- त्यावर ताट ठेऊन झाकून ठेवा. पातेले 10-12 मिनिट गरम होऊ द्या.
- तो पर्यंत एका खोलगट ताटली मध्ये सर्वदूर तूप लावून त्यात गोळे ठेवा.
- गोळे फुलतात त्या अंदाजाने कमीत कमी गोळे ठेवा.
- गोळ्यांवर बदाम किंचित दाबून लावा.
- आता ताटली प्री हिट केलेल्या पातेल्यात ठेवा.
- 15 मिनिटांनी गोळे फुलून त्याचा वरून फिकट लालसर रंग व खाली ब्राउन रंग आला असेल तर गॅस बंद करून गोळे असलेली ताटली पातेल्यातून बाहेर काढा व थंड होऊ द्या.
- जर खालून ब्राऊन रंग आला नसेल तर अजून 4-5 मिनिट बेक करा.
nankhatai recipe in marathi | maida biscuit recipe