Thursday, July 9, 2020

उडदाचं घुटं | recipe in marathi

​​उडदाचं घुटं



साहित्य : ​​

  1. एक वाटी उडदाची सालासह डाळ ,
  2. एक टेबलस्पून हरभर्या ची डाळ ,
  3. पाव वाटी किसलेले सुक्के गोटा खोबरं,
  4. ४-५ लसूण पाकळ्या,
  5. एक पेराएव्हढा आल्याचा तुकडा ,
  6. चवीनुसार मीठ,
  7. एक टेबलस्पून चिंचेचा कोळ

फोडणीसाठी :

  1. दोन चमचे तेल,
  2. मोहरी,
  3. जिरं,
  4. कढिपत्ता,
  5. हिरवी /लाल मिरची,
  6. मूठभर कोथिंबीर

कृती :

  1. अगोदर सालासकट उडदाची डाळ व हरभऱ्याची डाळ प्रेशर कुकर मधून ४ शिट्ट्या करुन शिजवून घ्यावी. गॅसवर एका कढल्यात कोरडं खोबरं आणि जिरं खरपूस भाजून घ्यावे. शिजलेल्या डाळी डावाने घोटून एकजीव करुन घ्याव्यात. आता घोटलेल्या डाळींचे वरण एका पातेल्यात काढून घेऊन त्यात दोन वाट्या पाणी घालून उकळायला ठेवा. भाजलेलं जिरं आणि खोबरं त्यात चुरुन घाला. मग चिंचेचा कोळ व चवीप्रमाणे मीठ घाला.
  2. आता गॅसवर एका कढल्यात तेलाची तडका फोडणी करावी. त्यात कढिपत्ता, हिरवी /लाल मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण घालावे. लसूण खमंग होईपर्यंत परतावे.
  3. नंतर ती तडका फोडणी उकळी आलेल्या घुट्यात घालावी.

टीप : ​​

काळ्या उडदाच्या साल असलेल्या डाळीचे घुटं हे जास्त चांगले लागते.


उडदाचं घुटं ची रेसिपी | udadache ghute recipe in marathi writing

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.