Thursday, July 9, 2020

हापूस आंब्याचं रसबाळी | recipe in marathi

​हापूस आंब्याचं रसबाळी -कोयाडं :

पिकलेल्या आंब्यांपासून बनवला जाणारा चविष्ट खास कोकणी पारंपारिक असा उन्हाळी स्पेशल-प्रकार


hapus ambyachi recipe in marathi writing

साहित्य :

१०-१२ छोटे छोटे पिकलेले आंबे,


फोडणीसाठी :

  • दोन टेबालस्पून तेल,
  • ४-५ लाल सुक्या मिरच्या,
  • अर्धा चमचा मेथीचे दाणे,
  • एक चमचा मोहरी,
  • एक छोटा चमचा जिरे,
  • एक छोटा चमचा हळद,
  • एक छोटा चमचा हिंग,
  • दोन वाट्या गूळ,
  • एक छोटा चमचा मीठ,
  • एक वाटी नारळाचे दूध.


कृती :

  1. प्रथम प्रेशर कुकरमधून आंबे सालासकट दोन तीन शिट्यावर उकडून घ्या. कुकरचे प्रेशर कमी झाल्यावर आंबे बाहेर काढून सोलून ठेवा.
  2. दुसरीकडे गॅसवर एक पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात जिरे व मोहरी घालून दोन्ही चांगली तडतडल्यावर त्यात मेथीचे दाणे घाला व ब्राऊन रंगावर परतून घ्या आणि मग त्या फोडणीत लाल सुक्या मिरच्या, हिंग व हळद घालून एखादे मिनिट परतून घ्यावं. नंतर त्यात उकडून साले काढलेले आंबे व एक वाटी नारळाचे दूध घाला. चवीनुसार मीठ व भरपूर गूळ घालून तो पूर्ण विरघळल्यावर एखादी उकळी काढून गॅस बंद करा.
  3. गरम चपाती किंवा पोळी बरोबर कोयीसकट सर्व्ह करा.


​​ambyacha ras | hapus ambyachi recipe in marathi writing

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.