Friday, July 10, 2020

​आलू पराठा - रेसिपी मराठी

​आलू पराठा रेसिपी मराठी :


​आलू पराठा रेसिपी मराठी

साहित्य :​​

2 वाट्या कणीक, 
अर्धा चमचा मीठ,
2 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन,
3 मोठे उकडलेले बटाटे,
7-8 लसूण पाकळ्या,
5-6 हिरव्या मिरच्या वाटून,
1 चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर,
मीठ,
साखर चवीनूसार,
पराठे तळ्ण्याकरता तेल अथवा तूप


कृती :

कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी. त्यांनतर बटाटे किसून घेऊन किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालून गोळा तयार करावा. भिजलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ समान भाग करावेत.


बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत. कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरून लाटीचे तोंड सर्व बाजूंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाठावर पिठी लावून लाटावा. नंतर जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा. तयार आहे गरमागरम आलू पराठा.




How to make yummy aloo paratha recipe in marathi 

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.