सुरळीच्या वड्या बनवा अगदी काही क्षणात
साहित्य:
- 1 बाउल बेसन
- 2 बाउल ताक
- 1 चमचा मिरची आले पेस्ट
- अर्धा चमचा हळद
- अर्धीवाटी ओले किंवा सुक्या खोबऱ्याचा किस आणि बारीक चिरून कोथिंबीर
- हिंग ,मोहरी,जिरे आणि कढीपत्ता याची फोडणी
- चवीनुसार मीठ
- वड्या करण्यासाठी 4 ते 5 थाळ्या तेल लावून तयार
कृती:
- वरील सर्व साहित्य एका मोठ्या बाउल मध्ये गुठळ्या राहू न देता एकत्र करावे आणि कुकर ला 3 शिट्या कराव्या नंतर कुकर चे झाकण पडले की बाउल बाहेर काढून डावाने मिश्रण एकजीव करावे आणि एक एक डाव पटापट तेल लावलेल्या थाळीत घालून वाटीने किंवा उलथन्याने पातळसर पसरवून घ्यावे
- सुरीने आपल्याला ज्या आकारात वड्या (लहान,मोठ्या) करायच्या आहेत त्या प्रमाणे लाईन आखून घ्याव्यात त्यावर खोबरे कोथिंबीर भुरभुरावे आणि हळुवार हाताने रोल करावे
- सगळे रोल करून झाल्यावर त्यावर फोडणी घालून सर्व्ह करावे.
सुरळीची वडी ची रेसिपी | suralichya vadya recipe in marathi writing