Saturday, July 11, 2020

पोहा पापड - मराठी रेसिपी

​चला तर आज आपण शिकणार आहोत पोहे पापड कसे बनवायचे :


जाणून घ्या पोहे पापड कशापासून बनवले जातात याची माहिती पुढीलप्रमाणे :-

साहित्य :

  1. एक किलो जाड पोहे,
  2. मीठ, ‍
  3. लाल तिखट,
  4. 30 ग्रॅम पापडखार,
  5. 25 ग्रॅम हिंग


कृती : 

  1. पोहे किंचित भाजून दळून घ्यावेत.
  2. त्यातील थोडे पीठ पापड लाटण्याकरिता ठेवून द्यावे.
  3. बाकीच्या पिठाइतकेच पाणी घेऊन,
  4. त्या पाण्यात अंदाजाने मीठ, तिखट, पापडखार व हिंग घालावा.
  5. पाण्याला उकळी आणावी व खाली उतरवून ठेवावे.
  6. नंतर त्यातील एक भांडे पोह्याचे पीठ घ्यावे व दोन्ही मळून गोळा करून घ्यावा
  7. तो गोळा उखळात मुसळाने चांगला कुटावा व लहान लहान गोळ्या करून त्यांचे पातळ पापड पोह्याच्या पिठावर लाटावे.
  8. तो गोळा संपल्यावर पुन्हा तसेच पाणी व पीठ घेऊन गोळा तयार करून घ्यावा.
  9. सगळे पाणी व सगळे पीठ कधीच एकदम मिसळून तयार करू नये.
  10. कारण त्यामुळे काही वेळ गेल्यावर त्याचा चिकटपणा कमी होतो.


poha papad recipe in marathi written

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.