Wednesday, July 8, 2020

​दावणगिरी लोणी डोसा | Recipes in Marathi

दावणगिरी लोणी डोसा


आज काल पुण्यात बर्‍याच ठिकाणी "दावणगिरी लोणी स्पंज डोसा" असे बोर्ड पहायला मिळतात. एखाद्या चांगल्या होटेलमध्ये अजुनही हा प्रकार मेनुमध्ये दिसला नाहीये. पण डोसा मात्र असतो अफलातून.

साहित्य | ingredients :


१/२ वाटी साबुदाणे
१/२ वाटी उडिद डाळ
१ वाटी जाडे पोहे
४ वाट्या तांदूळ
१५-२० मेथीचे दाणे
हे प्रमाण साधारण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरते

कृती :


हे सर्व कमित कमी ५ तास भिजत ठेवणे. नंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेणे. जराही रवाळ रहाता नये.

त्यात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा व मीठ घालून ढवळून उबदार जागेत रात्रभर ठेवणे.
डोसा करण्यापूर्वी यात थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे.
इतके पातळ की तव्यावर ओतल्यावर २-३mm जाड आपोआत पसरले जाईल. वरुन वाटीने पसरावे लागता नये. नाहीतर टेक्श्चर नीट येत नाही.
डोसा तव्यावर घालताना तवा खूप तापलेला असु नये. अन्यथा डोसा नीट पसरत नाही. डोसा घातल्यावर लगेच गॅस मोठा करावा.

डोसा सुकत आल्या​​वर वरुन लोणी घालावे. शक्यतो पांढरे लोणी वापरावे.

वरील बाजू पूर्ण सुकल्यावर एकदाच डोसा उलटावा.
लगेचच डोसा काढुन चटणी/सांबार याबरोबर सर्व्ह करावा.

how to make davangiri loni dosa in marathi | recipe of loni sponge dosa

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.